Monsoon update maharashtra today : बऱ्याच दिवसाच्या खंडानंतर मान्सूनचा पाऊस पुढील चार ते पाच दिवस कोसळणार असा अंदाज हवामान शास्त्र विभागांनी दिलेला आहे. त्यामुळे पावसाने उघडी दिलेल्या काळामध्ये शेतकऱ्यांनी आपली शेतीच्या मशागतीची कामे उरकून घ्यावी. कारण मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान शास्त्र विभागा कडून वर्तवण्यात आला आहे.
कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे वाढणार पाऊस Monsoon update maharashtra today
राज्यातील मराठवाड्यातील काही भागांमध्ये पुढील दोन दिवस पावसाची शक्यता असून, जळगाव नगर पुणे नाशिक सातारा या जिल्ह्यामध्ये चार ते पाच दिवस मेघ गर्जना व विजंच्या कडकडाटसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
या भागासाठी ऑरेंज अलर्ट जारी
रविवारी चंद्रपूर गडचिरोली या किल्ल्यांसाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला असून, घाटमात्याच्या परिसरामध्ये परिसरामध्ये जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली अशीच पुणे परिसरामध्ये देखील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आलेला आहे.
जायकवाडी धरणात 75 टक्के पाणीसाठा
मराठवाड्यातील सर्वात मोठा प्रकल्प म्हणजे जायकवाडी प्रकल्प यावर्षी पावसाने साथ दिल्यामुळे जायकवाडी धरण हे 75 टक्के पेक्षा जास्त भरलेली आहे. त्यामुळे मराठवाड्यातील शेतीचा सिंचनाचा उद्योग साठी लागणाऱ्या पाण्याचा प्रश्न मिटलेला आहे. जायकवाडी प्रकल्प च्या माध्यमातून मराठवाड्यातील छत्रपती संभाजी नगर जालना बीड आणि परभणी या विभागातील सुमारे एक लाख 80000 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली येते. धरणातील साठा 75% च्या वर आल्यामुळे वर्षभर शेतीसाठी पाणी उपलब्ध होणार लागणारे पाणी आणि पिण्यासाठी लागणार पाण्याचा प्रश्न देखील सुटला आहे.
अरबी समुद्र तसेच बंगालच्या उपसागर यामध्ये तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे चार ते पाच दिवस कोकण विभाग आता बहुतांश विभाग मध्ये पावसाची शक्यता आहे तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये देखील काही दिवस हलक्यां ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल याची शक्यता आहे.Monsoon update maharashtra today